अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या त्या आवाहनाला प्रतिसाद देत.
पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी नंतर आता पानोली व कारेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय पारनेर येथे रविवारी आ.लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
आ. निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास त्या गावासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. या आवाहनास तालुक्यातून आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आशादायी चित्र दिसत आहे.
दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन आ. लके यांना प्रथम प्रतिसाद दिला.
दरम्यान आता तालुक्यातील जवळपास २० ग्रामपंचायतीच्या निवडणुका विनविरोध होण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसातच काही गावांच्या निवडणुका बिनविरोध होतील, असे चित्र असल्याचे ॲड. राहुल झावरे म्हणाले.
कारेगाव व पानोली ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोन्ही गावातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते