अहमदनगर बातम्या

पत्रकार परिषदेनंतर सरपंच अन ज्येष्ठ नेते एकमेकांशी भिडले… पहा कोठे घडली घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- पत्रकार परिषदेनंतर चहापाना प्रसंगी किरकोळ कारणावरून एकापक्षाचे युवा सरपंच व ज्येष्ठ नेते आपसातच भिडल्याची घटना समोर येत आहे.

दरम्यान हि घटना पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील बस स्टँड जवळच्या एका हॉटेलमध्ये घडली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, एका पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मिरी येथे एकत्र आले होते.

पत्रकार परिषद पार पडल्यानंतर एका हॉटेलमध्ये कार्यकर्ते व पत्रकार एकत्रित चहा पाणासाठी बसले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विविध विषयावर चर्चा सुरू असतानाच मिरी जवळील एका गावचे युवा सरपंच व मिरी

येथील एक ज्येष्ठनेता यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली. दोघेही हॉटेलमध्येच एकमेकांवर धावून आल्याने उपस्थित कार्यकर्ते देखील काही वेळ गरबडून गेले.

परंतु विरोधकांना याचे आयते कोलीत मिळू नये म्हणून या दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न उपस्थित कार्यकर्त्यांकडून झाला. मात्र या वादाची तालुकाभरात जोरदार चर्चा झाली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office