महसूलनंतर आता पोलिसांचा दणका ‘या’ तालुक्यातील वाळूतस्करांची झालीय दैना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यात महसूलच्या पथकाने अवैध वाळूतस्करांच्या ४० लाखांच्या बोटी उद्ध्वस्त केल्या होत्या.

त्यानंतर आता पेडगाव शिवारातील भीमा नदी पात्रात श्रीगोंदा पोलिसांनी अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर छापा टाकून सुमारे १८ लाख रुपये किंमतीच्या २ यांत्रिक फायबर बोटी व २ सेक्शन बोटी जप्त करुन त्या नष्ट केल्या.

दरम्यान पोलिसांनी छापा टाकताच या बोटींतील इसम नदीत उड्या मारुन पळुन गेले. श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेडगाव गावच्या शिवारात सरस्वती,

भीमा नदीच्या संगमावरील भवानी माता मंदिराजवळ नदीपात्रात काहीजण यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळुचा उपसा करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी स.पो.नि. दिलीप तेजनकर यांना सुचना देत संबंधित  ठिकाणी छापा टाकुन कारवाई करण्यास सांगितली.

त्यानुसार पेडगाव गावच्या शिवारात भीमा नदीपात्रात किशोर किसन ओव्हाळ याच्या मालकीची एक फायबर व सेक्शन बोट तर नविद मैनुद्दिन शेख याच्या मालकीची एक फायबर व एक सेक्शन बोटीने अवैध वाळुचा उपसा करत असल्याचे आढळून आले.

त्यांच्यावर छापा टाकताच या बोटींमधील दोघे इसम हे नदीतील पाण्यात उड्या मारुन पळुन गेले. पोलिसांनी दोन फायबर बोटी व दोन सेक्शन असा सुमारे १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करत दोन्ही आरोपीविरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24