अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-मुलगा कोरोनातुन मुक्त झाल्याने हॉस्पिटल मधिल डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांसाठी काही तरी केले पाहिजे. या उद्देशाने मंगेश आजबे यांच्या मातोश्री यांनी हॉस्पिटल मधील डॉक्टर, कर्मचारी यांना उभा पोशाख देऊन त्यांनी केलेल्या सेवेतून उतराई होण्याचा प्रयत्न केला.
अत्तापर्यंन्त गेल्या १० महिन्यापासून डॉ आरोळे कोविड सेंटर मधून ४ एकवीससे साठ रुग्ण करोना मुक्त होऊन बाहेर पडले आहेत. विषेश म्हणजे या सर्व कोरोना बाधित रुग्णांवर आरोळे हॉस्पिटल ने मोफत उपचार केले होते. व सध्या देखील या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
या कोव्हीड हॉस्पिटलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुकाध्यक्ष मा मंगेश आजबे यांनी देखील लोकांच्या मदतीने मोठी मदत मिळवून दिली आहे.मंगेश आजबे हे रुग्णांची सेवा करत असतानाच अचानक पाच दिवसांपुर्वी त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. डॉ रवी आरोळे, डॉ शोभा आरोळे यांनी आजबे यांच्यावर उपचार करून त्यांना करोना मुक्त करून ठणठणीत बरे केले.
त्या अनुषंगाने आपण समाज्याचे देणे लागतो या भावनेतून त्यांच्या मातोश्री कांताबाई आजबे यांनी हॉस्पिटल मधील डॉक्टर, कर्मचारी यांना उभा पोशाख देऊन केलेल्या सेवेतून उतराई होण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी मंगेश आजबे कोरोना मुक्त झाले त्याच दिवशी या हॉस्पिटल मधिल सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांना मोफत पोषख देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ रवी आरोळे, शोभा आरोळे, डॉ प्रशांत खंडागळे, सुलताना शेख, शहाबाई कापसे यांच्या सह आजबे यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी दीपाली आजबे, बहीण कल्पना परकाळे, मेहुणे ज्ञानेश्वर परकाळे, मुलगी प्रणिती आजबे, मुलगा चिराग आजबे, आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved