उपोषण माघारीनंतर ‘हे’ राज्यमंत्री आले अण्णांच्या भेटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-शेतकरी प्रश्नावर उपोषणाची घोषणा करून नंतर माघार घेतल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर शेतकरी आंदोलन समर्थकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे.

अशातच आता शेतकरी नेते अशी ओळख असणारे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील विभागनिहाय पिकांना हमीभाव व बाजार मूल्य मिळाले पाहिजे, असं सांगून शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्या आणि आंदोलने यावर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच स्वामीनाथन आयोगासह शेतकऱ्यांसंबंधी अन्य पंधरा मुद्द्यांवर सहा महिन्यांच्या आत उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून निर्णय व्हावेत.

अन्यथा सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दिला.

केंद्र सरकारने आश्वासन दिले असल्याने अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू.

जर हे प्रश्न समाधानकारक पद्धतीने मार्गी लागले नाहीत तर आम्हीच पुढाकार घेऊन आंदोलन उभे करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. तत्पूर्वी, केंद्राला सूचविलेल्या मुद्यांना उशीर झाला. तो त्यांनी मान्य केला.

मी केंद्राला १५ मुद्दे सुचविले होते. हे मुद्दे आता कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील. हे प्रश्न सुटले तर शेतक-यांना दिलासा मिळेल. आज दिलेल्या आश्वासनामुळे मी उपोषण मागे घेतले आहे, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24