अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पारनेर शहरातील नगरपंचायतसमोर तसेच बाजार तळावर दोन दिवसांपासून काही कावळे मृतावस्थेत सापडले आहेत.
आजही दोन कावळे याठिकाणी मृत झाले आहेत. तसेच कावळे कशामुळे मृत झाले आहे, हे स्पष्ट झालेले नाही. सध्या राज्यात करोनाबरोबरच बर्ड फ्लूने डोके वर काढले असून नगर जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आला असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यासंदर्भात शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यात यासंदर्भात पशुवैद्यकीय अधिकार्यांनी पथके तयार केली आहेत. त्याद्वारे पक्षांचे सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात आलेले आहेत.
शहरातच अचानक बाजार तळावर दोन दिवसापूर्वी दोन-तीन कावळ्यांचा मृत्यू झाला. यामुळे नागरिकांत घबराट पसरली असून कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला तर नाही ना, अशी शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र याबाबत अहवाल आल्यानंतरच काय ते स्पष्ट होणार आहे.