आक्रमक कारवाई ! अनाधिकृत वाळू उपसा करणार्‍या 8 बोटी फोडल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  कुर्‍हाडवाडी व निमोणे (ता. शिरूर) हद्दीत नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतुकीवर शिरूर पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करून अनाधिकृत वाळू उपसा करणार्‍या 8 बोटी फोडल्या.

शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून वाळू माफीयांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण खानापूरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू माफीयांवर कडक कारवाई करण्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी आदेश दिल्यानुसार पथके तयार करून मोठी मोहीम आखण्यात आली

त्यानुसार नदी पात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने कुर्‍हाडवाडी, निमोणे येथील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करणार्‍या चार मोठ्या व चार लहान यांत्रिक बोटी फोडून उध्वस्त करण्यात आले.

त्यांचे वाहनांचा परवाना रद्द करण्याकरीता तालुका दंडाधिकारी तसेच प्रादेशीक परीवहन अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24