अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अकोलेच्या पोलिस निरीक्षक शबाना शेख यांच्या पथकाला नुकतेच मुंबईत अंमली पदार्थ ( एम.डी मेफेड्रॅान) विक्री करणारी व पुरवणारी टोळी पकडण्यात यश आले आहे.
या टोळीकडून तब्बल 12 कोटी 50 लाख रूपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले तालुक्यातील डोगरी पोलिस निरीक्षक शबाना शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डोगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 18 फेब्रुवारी 2021 रोजी इसाक.
इकबाल हुसेन सय्यद या आरोपीस 12 ग्रॅम अमली पदार्थ (एम.डी.मेफेड्रॅान) सह पकडुन गुन्हा दाखल केला अधिक तपास करुन शिताफीने अमली पदार्थ पुरवणारा अब्दुल वसीम अब्दुल अजिज शेख व दिपक संजीवा बगेरा यास पकडले व दिपक बगेरा याच्या कलीना येथील राहत्या घरातून मोठ्या अमली पदार्थाचा साठा हस्तगत करण्यात आला.
यावेळी तब्बल 25 किलो.ग्रॅम एम.डी (मेफेड्रॅान) इतका अमली पदार्थ साठा ज्याची किंमत 12 कोटी 50 लाख रुपये व रोख रक्कम 5 लाख रुपये, तसेच इतर साहित्य हस्तगत करुन मोठी कारवाई केली आहे.