अहमदनगर बातम्या

दिशाहीन धोरणामुळे शेती व शेतकरी संकटात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- मुळे शेती व शेतकरी संकटात अहमदनगर: महाराष्ट्रात शेतीविषयी योग्य धोरण व दिशा नसल्याने शेतीची व शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. आपण शेतीमध्ये पुढारलेले आहोत असे म्हणण्यात फारसे तथ्य उरलेले नाही.

राजकीय इच्छा शक्तीचा अभाव, प्रशासनाची उदासिनता व नैसर्गिक आपत्तीमुळे आपण अपेक्षित प्रगती गाठू शकलेलो नाही.शेतमालाला हमीभाव नसल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही, मग मुलामुलींच्या शिक्षणाचा ,

विवाहाचा खर्च व नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा या विवंचनेतून आलेल्या निराशेमुळे बळीराजा आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येत आहे. कांदयाचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

इतर शेतमालही कवडीमोल दरानेच विकला जात आहे.कोणत्याच शेत मालाला योग्य भाव मिळत नाही.खुराक व चाऱ्यासाठीचा खर्चही दिवसेंदिवस वाढत चालल्याने दूध धंदा घाट्यात आला आहे.

ऊस,फुले व फलोत्पादक शेतकऱ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची धारही बोथट झाली आहे, शेतमालास भाव मिळत नसल्याने कर्ज कसे फेडणार ? यामुळे कर्जबाजारीपणात वाढ होत

चालल्याने शेतकरी हताश झाला असून त्याला कोणीही वाली उरलेला नाही. शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत असूनही त्याला दिलासा देणारा कोणताही निर्णय घेतला जात नाही.

राज्याला अनेकवेळा दुष्काळसदृश्य परिस्थिती व नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला ; परंतु त्यासाठी धोरणाअभावी योग्य ते उपाय व सुधारणा होऊ न शकल्याने परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

शेतीविषयक ज्या उपाय योजना इतर राज्यात राबवल्या जातात तसे चित्र महाराष्ट्रात दिसत नाही . शासकीय योजनांवर अवलंबून असलेले शेतकरी, हे चित्र बदलून कृषी विषयक योग्य धोरण आखून त्याची योग्य अंमलबजावणी व्हायला हवी .

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office