Ahilyanagar News : यंदाचा उन्हाळा घाम काढणार असं वातावरण दिसतंय. मार्चमध्येच हिट ने अगदी उच्चांक गाठलाय. बुधवारी १२ मार्चला नगर शहराचे दिवसाचे तापमान ३९ अंश सेल्सियसवर गेले होते. गुरुवारी 13 मार्चला हेच तापमान ४० अंशावर जाताना दिसले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊ लागली. गेल्या १० दिवसांत शहराचे तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस होते.
उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे दिवसभर उन्हाचा कडाका वाढलेला असला, तरी पहाटे मात्र थंडी जाणवत होती. तीन दिवसापूर्वी शहराचे तापमान ३७ अंशावर, मंगळवार व बुधवारी ३९ अंशावर असलेले तापमान गुरुवारी ४० अंशावर जाताना दिसले. उन्हाचा कडाका वाढत असताना ग्रामीण भागातून पाणी टँकरलादेखील मागणी वाढली आहे.

म्हणजे लोकांचा घसाही हा उन्हाळा कोरडा करताना दिसतोय. आता त्यामुळे सध्या नगरकर उष्णतेने हैराण झाले असून आगामी एप्रिल आणि मे हे उन्हाचे कडाक्याचे दिवसात कसे असणार याबाबत आताच चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वतोपरी सावधानी बाळगणे व उष्णतेपासून वाचण्याचे उपाय करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.