अहमदनगर ब्रेकिंग : सी सी टीव्ही यंत्रणेत छेड छाड करणारा निलेश लंके यांच्या यंत्रणेने रंगेहात पकडला !

Tejas B Shelar
Published:

नगर दक्षिण मतदार संघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक बेकायदेशीर व्यक्ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या यंत्रणेने रंगेहात पकडला.

सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न नीलेश लंके समर्थकांनी हाणून पाडला केंद्र, राज्य व स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटर जवळ जातेच कशी ?

अगदी त्या भागातील वाहतूकही वळविण्यात आलेली असताना  प्रशासनच झोप घेतल्याचं सोंग करत आहे का हा प्रश्न उपस्थित झाला असून सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमाठ हे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून स्वतः उमेदवार असल्यासारखी भूमिका निभावत आहेत त्यामुळे या अनाहूत व्यक्तीच्या प्रवेशाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे असे लंके समर्थकांकडून बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe