अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- अनैसर्गिकरित्या होणार्या मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून केली जाते. जिल्ह्यातील 30 पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये तीन हजार 265 व्यक्तींचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
यामध्ये राहुरी 204, कोतवाली 148, तोफखाना 160, भिंगार कॅम्प 116, एमआयडीसी 182, नगर तालुका 163, पारनेर 142, सुपा 42, कर्जत 114, जामखेड 88, श्रीगोंदा 113,
बेलवंडी 54, शेवगाव 140, पाथर्डी 171, नेवासा 153, सोनई 68, शिंगणापुर 31, श्रीरामपूर शहर 133, श्रीरामपुर तालुका 77, कोपरगाव शहर 68, कोपरगाव तालुका 63,
शिर्डी 115, राहाता 65, लोणी 114, संगमनेर शहर 139, संगमनेर तालुका 120, घारगाव 59, आश्वी 53, अकोले 130, राजुर 40 अशा मृत्यूंची नोंद झाली आहे.
गळफास, विषारी औषध घेऊन, पाण्यात बुडून, अपघात, आग, विजेला चिटकून किंवा सर्प दंश आदी घटनांमुळे मृत्यू झालेल्यांची नोंद सुरूवातीला अकस्मातमध्ये घेतली जाते.
तपासाअंती यातील काही अकस्मातचे गुन्हे दाखल केेले जातात. सर्वाधिक अकस्मात मृत्यूची नोंद राहुरी पोलीस ठाण्यात झाली असून सर्वात कमी शनिशिंगणापुर पोलीस ठाण्यात झाली आहे.
नैराशाच्या कारणातून मानव आपले जीवन संपवितो. यासाठी तो गळफास, विषारी औषध, पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करतो. याची नोंद सुरूवातीला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूमध्ये केली जाते.
मयत व्यक्तीस कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्यास अकस्मात नोंदवरून संबंधीत व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला जातो. रस्ता अपघातात मृत्यू होण्याची संख्या मोठी आहे.
जिल्ह्यात दररोज कुठेना कुठे अपघातात एक-दोन वाहन चालकांचा मृत्यू होतो. याची नोंदही पोलीस ठाण्यात अकस्मात म्हणून केली जाते. तपासाअंती धडक देणार्याविरूध्द गुन्हा दाखल केला जातो.
गळफास, पाण्यात बुडून, विषारी औषध प्राशन करून किंवा इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला सरकारी अथवा खासगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर रूग्णालय प्रशासनाकडून संबंधीत व्यक्तीची माहिती पोलीस ठाण्यात कळविली जाते.
रूग्णालयाकडून आलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली जाते. 2021 मध्ये अशा नोंदी झालेल्या मृत्यूंची संख्या तीन हजार 265 इतकी आहे.
ही आकडेवारी धक्कादायक अशीच आहे. अनैसर्गिकरित्या मृत्यू होणार्या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मार्च 2020 मध्ये करोनाची पहिली लाट आली.
या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी होते. परंतू, फेब्रवारी 2021 मध्ये आलेल्या दुसर्या लाटेत करोनामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते.
करोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत दोन वर्षांत आतापर्यंत जिल्ह्यात सात हजारापेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. येथे वर्षभरात तीन हजार 265 व्यक्तींचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.