अहमदनगर बातम्या

अहमदनगर @43 अंश सेल्सिअस

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Temperature forecast :- मार्चचा शेवटचा आठवडा तप्त गेल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सूर्य आणखी तळपायला सुरवात झाली आहे. शनिवारी अहमदनगरमध्ये कमाल तापमान ४३.० अंश सेल्सिअस नोंदले गेले.

या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक तप्त दिवस ठरला. कमाल तापमानात आज सरासरीच्या तुलनेत ६ अंशाने वाढ झाली आहे. हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेचा आज शेवटचा दिवस आहे.

असं असलं तरी उद्यापासून तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नाही. ५ एप्रिलनंतर सायंकाळी आकाश ढगाळ होण्याची शक्यता असून त्यामुळं तापमानात थोडी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नगरमध्ये १० एप्रिल २०१० रोजी किमान तापमान ४८.२ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं होतं. ते नगरचं आतापर्यंतचं उच्चांकी तापमान म्हणून हवामान विभागाकडं नोंद आहे.

त्यानंतर २०१७ मध्ये १९ एप्रिलला पारा ४४.३ अंशावर गेला होता. बहुतांश वेळा एप्रिलमध्ये नगरला ४२ ते ४३ अंश कमाल तापमान नोंदलं गेलेलं आहे.

Ahmednagarlive24 Office