अहमदनगर बातम्या

अहमदनगरकर सावधान ! पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021  अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात येत्या काही तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज 07 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता नवा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी,

कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी 30-40 किमी प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ आणि मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहमदनगर, पालघरमध्ये पुढील 3-4 तासांच्या दरम्यान बाहेर जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन आयएमडी मुंबई विभागाने केलं आहे.

काल झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली आहे.

येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा कालच देण्यात आला होता. राज्यात पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Ahmednagarlive24 Office