अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक आणि कारच्या धडकेत एकाचा मृत्यू !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- भरधाव वेगातील माल ट्रक व वॅगनर कारचा अपघात झाला असून यात एकजण ठार झाला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरातील कण्हेरमळा परिसरात मालवाहतूक (ट्रक क्र. एमएच १६ एवाय ५५३५) आणि वॅगनर

गाडी (क्र.एमएच १२ पी क्यू ०१४४) यांची दि.२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धडक होऊन वॅगनर मधील भाऊआप्पा शिवाजी काळे (वय- ४५ वर्षे रा. हिवरेझरे ता.नगर) यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर असे की, दौंड कडून नगरकडे जाणारी भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रक (क्र.एमएच १६ एवाय ५५३५) आणि नगर कडून दौंडकडे जाणारी वॅगनर गाडी (क्र.एमएच १२ पी क्यू ०१४४) यांची रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातात वॅगनर कार चक्काचुर होउन गाडीतील भाऊआप्पा शिवाजी काळे (वय- ४५ वर्षे रा. हिवरेझरे ता.नगर) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच ट्रक वरील चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणाची माहिती बेलवंडी पोलिस ठाण्यात समजताच पोलिस उपनिरिक्षक प्रकाश बोराडे, पोलिस कर्मचारी मधुकर सुरवसे, बजरंग गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Ahmednagarlive24 Office