अहमदनगर ब्रेकिंग : खाजगी बस – ट्रकचा भीषण अपघात वाघुंडे शिवारातील घटना, बारा प्रवासी जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर पुणे महामार्गावरील वाघुंडे शिवारात खाजगी बस – ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज शुक्रवारी ( दि.१७) पहाटे हा अपघात घडला.

शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर वाघुंडे गावच्या शिवारात माल वाहतूक ट्रक पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने जात होती.

त्याच वेळी एक खाजगी बस प्रवासी घेऊन मुबईवरून छत्रपती संभाजी नगरला जात होती. पहाटे पाच वाजता बस चालकाला पुढील ट्रकचा अंदाज न आल्याने बसचे ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसली.

यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते. यात बारा जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यात बसचालक हा गंभीर आहे. सुपा येथील खासगी रुग्णवाहिकेचा चालक सादिकभाई हे तातडीने धावून गेल्याने अपघातातील सर्व जखमींना वेळीच मदत मिळाली. या अपघातग्रस्त रूग्णांसाठी सादिकभाई देवदूत ठरल्याची चर्चा होती.