अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : ७२ वर्षीय वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील कनगर येथील भीमाबाई नालकर या ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Ahmednagar Suicide News)

सोमवारी सकाळी तालुक्यातील कणगर येथे आत्महत्येची ही घटना घडली. भीमाबाई गंगाधर नालकर हिने राहत्या घराशेजारी असलेल्या शेडमध्ये नायलाॅन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

नातेवाईकांनी भीमाबाई यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मृत घोषित केले. आत्महत्यचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास हवालदार ज्ञानेश्वर गर्जे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office