अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या ठिकाणी बाॅम्ब सदृश्य वस्तू?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात शृंगऋषी डोंगराच्या पायथ्याजवळ रमेश सोनाजी चेमटे यांच्या शेताच्या बांधावर जुन्या काळातील बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली.

मंगळवारी सकाळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे हे शृंगऋषी गडाकडे फिरायला गेले होते. या भागात रमेश चेमटे यांची शेती अाहे. शेताच्या कडेला त्यांना बाॅम्ब सदृश्य वस्तू दिसली होती.

चेमटे यांनी याबाबत तरटे यांना माहिती दिली. गतवर्षी याच भागात बाॅम्ब सदृश्य वस्तू आढळली होती. त्यावेळी लष्कराचे विंग कमांडर अजितकुमार भट्टाचार्य यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता

ती वस्तू जुन्या काळातील बाॅम्ब असल्याचा निर्वाळा दिला होता. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तरटे यांनी सापडलेल्या वस्तू बाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती दिली.

मात्र सायंकाळपर्यंत कोणीही घटनास्थळी फिरकले नाही. सध्या या वस्तू भोवती दगड ठेवून त्यावर पालापाचोळा टाकून झाकून ठेवली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24