Ahmednagar Breaking : दुचाकीवरून चाललेल्या अहमदनगरमधील प्रसिद्ध महाराजांवर बिबट्याची झडप

Ahmednagarlive24 office
Published:
bibatya

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात बिबट्याचा वावर हा सध्या नित्याचाच झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात विशेषतः उत्तरेकडे बिबट्याचे प्रमाण जास्त आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना या नेहमीच समोर येत असल्याने लोकांत दहशत देखील असते.

आता आणखी एक मोठे वृत्त अहमदनगरमधून आले आहे. कीर्तन करून निघालेल्या महाराजांवर बिबट्याने झडप घातली आहे. कीर्तनकार भागवत प्रकाश तिखांडके (वय २४) हे शेंडीवरून उडदवणे येथे रात्री १२.३० वाजता येताना बिबट्याने हल्ला केला.

मात्र त्याची झेप चुकली व मोटरसायकल मागच्या बाजूला धडक बसली. बिबट्या व भागवत तिखांडके महाराज दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले.

याबाबतचे वृत्त असे की, गुहिरे येथे कीर्तनाच्या कार्यक्रमावरून उडदवणे गावी कीर्तनकार भागवत प्रकाश तिखांडके महाराज हे आपल्या मोटरसायकलवरून रात्री परतत होते. ते पांजरे शिवारात येताच येथील शिवारात एका झाडाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झेप घेऊन हल्ला केला.

मात्र त्याची झेप चुकल्याने मोटरसायकल घसरून रस्त्यावर पडली, त्यात दोघेही जखमी झाले. मोठा आवाज झाल्याने बिबट्या जंगलात पळाला. भागवत तिखांडके महाराज यांच्या उजव्या, डाव्या हाताला पाठीवर गंभीर जखमा झाल्या. मात्र त्याही अवस्थेत तिखांडके महाराज यांनी मोटरसायकल सुरु करून घर गाठले.

तेथे पोहोचल्यावर व झाला प्रकार कळल्यावर त्यांना स्थानिकांनी खाजगी दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. याबाबत वन्यजीव विभागाचे डी.डी. पडवळ यांनी याबाबत चौकशी करून जखमींना मदत देण्याचे मान्य केले. या परिसरातील रात्री अपरात्री फिरताना अथवा प्रवास करताना सतर्क रहावे असे आवाहन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe