अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-25 फेब्रवारी 2022 रोजी नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसतानाच आता पुन्हा गायके मळा परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अंदाजे 55 वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गायके मळा परिसरातील एका शेतामध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती गुरूवारी दुपारी एक वाजता कोतवाली पोलिसांना स्थानिक नागरिकांनी दिली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. सुमारे 10 ते 12 दिवसांपासून हा मृतदेह तेथे पडून असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे वय अंदाजे 55 वर्षे आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही. ओळख पटविण्याचे काम कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शवविच्छेदन करण्यास अडचणी निर्माण झाली आहे. जागेवरच शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया कोतवाली पोलिसांकडून सुरू होती.