Ahmednagar Breaking : अपघाताच्या काही घटना ताजा असतानाच आता अहमदनगरमधून एक महत्वाची बातमी आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बीडमधील गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अहमदनगरमध्ये अपघात झालाय.
हा अपघात आज (बुधवार) दुपारच्या सुमारास कारचा टायर फुटल्याने झाला आहे. या अपघातानंतर विठ्ठल महाराज शास्त्री यांना अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे.
अधिक माहिती अशी : बीडच्या गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून राज्यभर त्यांचा भक्तपरिवार आहे. पाथर्डीमध्ये गाडीचा टायर फुटल्याने त्यांच्या कारला अपघात झाला अशी माहिती मिळाली आहे.
या अपघातात विठ्ठल महाराज शास्त्री हे जखमी झाले असून त्यांना नगर मधील एका हॉस्पिटलमध्ये आणले होते व त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे असताना विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला हा अपघात झालाय.
विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारचा टायर फुटला आणि त्यानंतर त्यांची गाडी खड्ड्यामध्ये जाऊन आदळली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघाताने विठ्ठल महाराज यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना दवाखान्यात आणल्याने तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
विठ्ठल महाराज सुखरूप
दरम्यान सध्या विठ्ठल महाराजांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते सुखरुप आहेत अशीही माहिती मिळाली आहे. बीडमधील गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री हे लाखो भाविकांसह श्रद्धास्थान असून अनेक लोक त्यांना गुरुस्थानी मानतात. देशाच्या कानाकोपऱ्यातूनही भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत असतात.