अहमदनगर ब्रेकिंग: पुणे- नाशिक महामार्गावरील चंदनपुरी घाटात अपघात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे, आज नाताळाच्या दिवशी जिल्ह्यातील एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहे.

दरम्यान हा अपघात संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

टेम्पो हा पुणे येथून आळेफाटामार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. टेम्पो पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात आला असता त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात मोटारगाडीतील पाच जण जखमी झाले आहे. या अपघातात मोटारगाडीचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले होते.

यावेळी मोटारगाडीतील जखमींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना स्थानिक नागरिकांनी मोठी मदत केली. दरम्यान या अपघातामुळे बराच वेळ वाहतुकही ठप्प झाली होती. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अहमदनगर लाईव्ह 24