अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- क्लार्क म्हणून नोकरीस असलेल्या प्रतीक बाळासाहेब काळे या तरुणाने संस्था आणि साखर कारखान्यातील सात कर्मचाऱ्यांच्या मानसिक त्रासास वैतागून 29 ऑक्टोबर रोजी नगर-औरंगाबाद रोडवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या आत्महत्या प्रकरणी प्रतीकची बहिण प्रतीक्षा बाळासाहेब काळे हिच्या तक्रारी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुळा एज्युकेशन मधील पाच आणि मुळा साखर कारखान्यातील दोन अशा कामास असलेल्या सात जनांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
या दरम्यान आज विनायक दामोदर देशमुख याला पोलिसांना शोधण्यात यश आले आहे. देशमुखला ताब्यात घेतले आहे. प्रतीकने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या भावास व्हाट्सएपवर पाठवला होता.
नंतर हा व्हिडीओ समाजमाध्यमातही व्हायरल झाला होता. या व्हिडिओत प्रतीकने देशमुख याचे नाव घेतले आहे. देशमुख ‘मुळा’ संस्थेत महत्वाच्या पदावर असल्याचे समजते.