अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: मुंबईला पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीला त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या युवकाने पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.(Ahmednagar Crime News)

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी त्या युवकाला अटक केली आहे. सलमान बशीर शेख (वय 21 रा. जालना, हल्ली रा. कोठला) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगचा गुन्हा दाखल होता.

आता यामध्ये वाढीव कलम लावण्यात आले आहे. पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईने पोलिसांत जबाब दिला आहे. आरोपी शेख विरोधात अत्याचार, पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अहमदनगर शहरात राहणारी अल्पवयीन मुलगी एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. यादरम्यान तिची सलमान शेख याच्यासोबत ओळख झाली. सलमान याने तिच्यासह घरच्यांना धमकावत तिला मुंबई येथे पळवून नेले.

त्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तिच्या घरच्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मिसिंग दाखल करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीसह त्या युवकाचा शोध घेतला.

ते मिळून आल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या आईचा जबाब नोंदविला.

पूर्वी दाखल असलेल्या मिसिंगच्या गुन्ह्यात अत्याचार, पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे करीत आहे.

Ahmednagarlive24 Office