अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव हद्दीत आग्रेवाडी परिसरात मुळा नदि पात्रात शनिवार दि 22 जानेवारी रोजी पुरुष जातीचा मुतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
म्हैसगाव परिसरातील आग्रेवाडी-तास पुलालगत मुळा नदीपात्रात एक पुरूष जातीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला.
या मृतदेहाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून मुतदेह बाहेर काढण्यात आला असुन
राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्यानंतर मृतदेह राहुरी येथे नेण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे