अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ मोठ्या रुग्णालयातून किडनी चोरीचा प्रकार, सोलापूरच्या व्यक्तीमुळे प्रकरणास वाचा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : संगमनेर शहरातील एका रुग्णालयात किडनी चोरण्याचा प्रकार सोलापूरच्या एका व्यक्तीने समोर आणला आहे. त्याने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला आहे.

संगमनेर शहरातील मोठ्या रुग्णालयात सोलापूर येथील एक व्यक्ती उपचार घेत होता. तो ठणठणीत होता, अचानक एके दिवशी तपासणीत आढळुन आले की, त्या व्यक्तीच्या किडनी नाही.

त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयामधून सी.आर.पी.सी १५६(३) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करावा, असा आदेश करण्यात आला होता. आज कित्तेक दिवस उलटुनही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही अशी माहिती समजली आहे.

दरम्यान आता या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई का? तसेच ज्या रुग्णालयात हा झाला प्रकार झाला त्यांच्यावर गुन्हा कधी दाखल होईल? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

न्यायलयाचा अवमान?
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात न्यायालयाचा अर्ज हरवतो आणि संबंधित व्यक्तीवर अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असून प्रशासनाने ही बाब गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशीही चर्चा आहे.

प्रकरणास वाचा फुटल्याने खळबळ
किडनी चोरीचा प्रकार गंभीर असून ही वार्ता सर्वत्र पसरताच नागरिकांत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला सोलापूरच्या या व्यक्तीमुळे वाचा फुटली आहे. सोलापूर येथील एक व्यक्ती उपचार घेत होता.

तो ठणठणीत होता, अचानक एके दिवशी तपासणीत आढळुन आले की, त्या व्यक्तीच्या किडनी नाही , त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

Ahmednagarlive24 Office