अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आज सायंकाळी आला आहे.
हा व्यक्ती हिवरे कोरडा येथे 1८ मे रोजी हा रूग्ण आपल्या पत्नी व दोन मुलीसह ठाण्यावरून तो गावी आला होता.
हा पुरूष ४८ वर्षीय असुन तो कुटुंबासह गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आठ दिवस विलगीकरण कक्षामध्ये होता.
माञ घरी गेल्यानंतर या रूग्णाला सायंकाळी ताप येऊ लागल्याने गावातील ग्रामस्थांनी जिल्हा रूग्णालयातील डाॅक्टर यांच्याशी संपर्क केला
यानंतर काही वेळामध्ये या रूग्णाला पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले होते .
या रूग्णाचे घशातील स्ञाव तपासणीसाठी कोरोना टेस्ट लॅब कडे पाठविण्यात आले होते त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com