खर्डा : कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव पाहता खर्डा येथे गेली अनेक दिवस लॉकडाऊन असल्यामुळे खर्डा शहर पूर्णपणे बंद असताना तोंडाला मास्क न लावता मोकाट फिरणाऱ्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
खर्डा येथील सोनेगाव चौकात पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज साखरे यांना एक इसम विनाकारण फिरताना दिसून आल. त्याला घराच्या बाहेर का पडला असे विचारले असता त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही व त्याने तोंडाला मास्क ही लावला नव्हता.
त्यामुळे रमेश भागवत होडशीळ राहणार गितेवाडी या इसमावर खरड्यातील पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या खर्डा मध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, तरी नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू आणण्यासाठीच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®