अहमदनगर बातम्या

घट्ट मिठी मारलेल्या कपड्याने बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, अहमदनगरमध्ये खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : मागील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या पती पत्नीचा घट्ट मिठी मारून कमरेला कापडाने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे.

हा मृतदेह एका विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आले आहेत. ही घटना तालुक्यातील खिरविरे येथील आंबेविहीरवाडी शिवारात उघडकीस आली. गुरुवारी (४ जुलै) ही घटना समोर आली अन एकच खळबळ उडाली.

धक्कादायक म्हणजे या मृतदेह सापडलेल्या जोडप्याचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. काल रात्री उशिरा अकोले ग्रामीण रुग्णालयात या दोघांचे मृतदेह आणण्यात आले. ही आत्महत्या आहे की घातपात? या बाबत सध्या उलटसुलट चर्चा असून पोलिस तपास करत आहेत.

बहिरू काळू डगळे (वय २५) व सारिका बहिरू डगळे (वय २२) असे या मृत दोघांचे नावे आहेत. अकोले पोलिसांत १ जुलै रोजी हे जोडपे हरवल्याची तक्रार आलेली होती. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे काल दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले.

समजलेल्या माहितीनुसार हे दोघे ३० जून रोजी रात्री घरी कुणाला काहीही कल्पना न देता बहर पडलेले होते. त्यांच्या कुटुंबियांनी सगळीकडे शोधले पण ते सापडले नाहीत. अखेर काल गुरूवारी दुपारी खिरविरे येथील आंबेविहीर येथील एका विहिरीत हे दोघे आढळून आले.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली अन परिसरात खळबळ उडाली.पोलिसांनी घटनास्थळी येत गावकऱ्यांच्या मदतीने हे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले असून हे मृतदेह एका कापडाने बांधलेले असल्या कारणाने

ही हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत. प्रॉपर्टीच्या वादामुळे त्यांचा खून झाला असावा असाही आरोप त्यांच्या एका नातलगाने केल्याचे समजते.

Ahmednagarlive24 Office