Ahmednagar Breaking : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोला अहमदनगरमध्ये अपघात, १० महिला जखमी

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar Breaking : दर्शनासाठी गेलेल्या टेम्पोला कर्जत तालुक्यातील भोसा शिवारात अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. यामध्ये बारडगाव सुद्रिक येथील १० महिला जखमी झाल्याची माहिती समजली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले होते.

अधिक माहिती अशी : कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील भाविक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणारे आत्माराम महाराज यांच्या मांदळी येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून सर्वजण पिकअप टेम्पोमधून येत असताना दुपारी तीन वाजता भोसे गावाच्या शिवारामध्ये ब्रेक फेल झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटला.

त्यात अलका सुद्रिक , जयश्री सुद्रिक, आशाबाई सुद्रिक, रूपाली गावडे, पार्वती शिंदे, भामाबाई शिंदे, रेणुका कांडेकर, आश्विनी सुद्रिक, रेखा शिंदे, संगीता सुद्रिक या महिला जखमी झाल्या. परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ इतरांना मदतीला बोलावले.

या अपघाताची माहिती बारडगाव सुद्रिक येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य संदीप गावडे यांना समजली. ते तत्काळ अपघातस्थळी गेले. जखमींना तत्काळ त्यांनी इतर वाहनांमधून श्रीगोंदा येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. दरम्यान हा अपघात होताच आमदार रोहित पवार यांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती देण्यात आली.

त्यांनी तत्परतेने श्रीगोंदा येथे सर्व जखमींना उपचारासाठी नेण्याबाबत सूचना दिल्या. तेथील डॉक्टरांना अपघाताची माहिती देऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली. जखमींच्या उपचारांचे शुल्कही स्वतः भरणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते.

अहमदनगर जिल्ह्यातून अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नुकतीच कोपरगाव तालुक्यात देखील मजुरांच्या टेम्पोला अपघात झाल्याची घटना घडली होती. यात दोन ठार तर बरेच मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. आता ब्रेक फेल होऊन झालेल्या या कर्जत तालुक्यातील अपघाताने खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe