Ahmednagar Breaking : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात, कार ने घेतल्या तीन पलट्या, एक ठार सात जखमी

Pragati
Published:
car

Ahmednagar Breaking :  शिर्डी येथे साईबाबाचे दर्शनानंतर ओडिसा येथील भाविकांना शिंगणापूर येथे शनिदर्शनाला जाणारी भरधाव इटिंगा कार मोटरसायकलवर जावून आदळल्याने एक ठार, तर सात जखमी झाले आहेत. अपघातानंतर इटिंगा कारने तीन वेळा उलटली.

मात्र लहान मुलांसह भाविक सुदैवाने बचावले. जखमींपैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. दुचाकीचालक रंगनाथ गंगाधर आरंगळे (वय ६१, रा. आरंगळे वस्ती, राहुरी फॅक्टरी) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. दुचाकीवर मागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे (रा राहुरी फॅक्टरी) व कारमधील ओरिसा राज्यातील सुश्मिता संतोष पुष्टी (वय ४६) गंभीर जखमी आहेत.

त्यांच्यावर राहुरी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील चार जण किरकोळ जखमी झाले. इटिंगा एम. एच. २० एफ. जी. ७०२७ क्रमांकाची कार ७ भाविकांना घेऊन शिर्डीकडे जात होती. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता.

गुहा हद्दीतील सेल पंपाजवळ येताच इर्टिगा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने किद्ध दिशेचे दुभाजक तोडून कार मोटरसायकलला जावून धडकली. कारने तब्बल तीन पलट्या खाल्ल्याने भाविक कारमध्ये दबले गेले होते. या भाविकांनी आरडाओरड केल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन धारकांनी घटनास्थळी धाव घेऊन कारचे दरवाजे तोडून भाविकांना बाहेर काढले.

ठार झालेले रंगनाथ अरांगळे हे मोटरसायकलवर बुधवारी लोणी येथे भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात जात होते. राहुरी फॅक्टरी येथील घरापासून दोन किलोमीटर अंतरावर जाताच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातस्थळी एकेरी वाहतुकीमुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेले. अनेक जणांना अपंगत्व आले. आज (बुधवारी) एकेरी वाहतुकीने आणखी एकाचा बळी घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe