अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक; 11 अटकेत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करून जातीयवादी घोषणाबाजी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमारे सव्वाशे जणांविरूध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.

दरम्यान 11 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काल रात्री 11 वाजता तख्ती दरवाजा व तेलिखुंट परिसरात ही घटना घडली.

शबाब शहानवाज शेख (वय 34 रा. बाबा बंगाली), फरहान फैरोज खान (वय 19 रा. मुकुंदनगर), मुजाहीद हुसैन शेख (वय 21 रा. सर्जेपुरा),

इरफान शकील शेख (वय 29 रा. तेलिखुंट), सोयब नादीर शेख (वय 33 रा. फकीरगल्ल्ली, सर्जेपुरा), आरिफ आसिफ सय्यद (वय 21 रा. मुकुंदनगर),

शाकीब अन्सार सय्यद (वय 21 रा. आलमगीर मैदान, मुकुंदनगर), दानिश शकील सय्यद (वय 22 रा. दरबार चौक, मुकुंदनगर), तहा अनवर खान (वय 21 पाचलींब गल्ली),

अदनान हुसेन शेख (वय 18 रा. कोठला), समी जावेद पठाण (वय 19 रा. मुकुंदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच इतर 50 ते 60 जण पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरपीआयच्या आठवले गटाची मिरवणूक रात्री 11 वाजता तेलिखुंट परिसरात आली असताना अचानक जातीयवादी घोषणाबाजी सुरू झाली.

काही क्षणातच मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. यावेळी घटनास्थळी बंदोबस्ताला असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी जमावाच्या दिशेने जाताच त्या समाजकंटकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या दगडफेकीत काही युवकांसह पोलिस कर्मचार्‍यांनाही मुक्कामार व किरकोळ दुखापत झाली.

तत्पूर्वी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तख्ती दरवाजा येथे दोन गटांत जातीयवादी घोषणाबाजी झाली. या प्रकरणी उमेश दगडू शेरकर यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे.

मिरवणूक सुरू असताना सुनील मुरलीधर क्षेत्रे, राकेश रवींद्र वाघमारे, मृणाल विलास भिंगारदिवे, आकाश सुधीर सरोदे, सुबोध प्रविण ढोणे, प्रशांत पाटोळे, सचिन घनश्याम बुंदेले,

जयेश लक्ष्मण माघारे यांच्यासह 20 ते 25 जणांनी दोन धर्मात तेढ निर्माण होवून दंगा निर्माण होईल या उद्देशाने दुसर्‍या गटाकडे पाहून घोषणाबाजी केली.

त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसर्‍या गटातील कासीम शेख, मतीन शेख पहिलवान, शहा बुर्हाण ऊर्फ शानू, अब्दुल कादर, शहानवाज आस्मा क्रॉकरीवाला व इतर 20 से 25 जणांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार करत जमावाला पांगवले.

Ahmednagarlive24 Office