Ahmednagar Breaking : पुणे येथून बेपत्ता झालेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा अहमदनगर मध्ये खून करण्यात आलाय. एका महाविद्यालयीन मित्रासह तीन जणांनी खंडणीसाठी तिचे अपहरण करून तिचा गळा दाबून तिला मारून टाकल्याचे पोलीस तपासात प्राथमिक माहिती समोर आली आहे.
रविवारी (७ एप्रिल) अहमदनगरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत तपस सुरु केला होता. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी : सदर विद्यार्थिनी वाघोली परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण अभियांत्रिकीचे घेत होती. 29 मार्च रोजी, एक महाविद्यालयीन मित्र आणि इतर दोघे तिला भेटले आणि नंतर तिला तिच्या वसतिगृहात सोडले. दुसऱ्यादिवशी 30 मार्च रोजी ते तिला अहमदनगरमध्ये घेऊन आले. त्यांनी त्या मुलीच्या पालकांकडे नऊ लाख रुपयांची खंडणी मागितली.
त्यानंतर त्यांनी तिचा गळा दाबून खून केला, तिचा मृतदेह अहमदनगरच्या बाहेरील बाजूस पुरुनही टाकला. त्यानंतर तिच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून घेतले होते अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क होऊ न शकल्याने ते कॉलेज आणि वसतिगृहात आले, परंतु जेव्हा त्यांना ती सापडली नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
त्यानंतर आरोपीने मृत मुलीच्या आई-वडिलांना मेसेज करून नऊ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
त्यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन आरोपींवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीना ताब्यात घेतले. तिघांनी पोलिसांना केलेल्या गुन्ह्याबद्दल कबुली दिली आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.