अहमदनगर बातम्या

‘झिका’ विषाणूची अहमदनगरमध्ये एंट्री, ‘या’ तालुक्यात रुग्ण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : सध्या ‘झिका’ च्या रुग्णांबाबत मोठी चर्चा सुरु आहे. याचे कारण म्हणजे पुण्यात याचे काही रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातही ‘झिका’ ने पाऊल ठेवल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मध्ये झिका चा रुग्ण आढळला असल्याचे समजते. दरम्यान नाशिक मध्ये उपचार घेऊन हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला असून तो सुखरूप घरी परतला आहे.

संगमनेर येथील एका ६६ वर्षीय पुरुषाला झिकाची लागण झालेली होती अशी माहिती समजली आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्याने काही दिवस उपचार घेतले व तो आता बरा झाला आहे.दरम्यान नाशिक विभागाने अहंमदनगरच्या आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली असल्याचाही दावा करण्यात आलाय. पुण्यातील एका ठिकाणी ‘झिका’चे तीन रुग्ण आढळल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. दरम्यान या नंतर राज्यसरकारने राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट केला.

दरम्यान आता पुण्याच्या पहिलेच नाशिकमध्ये संगमनेरच्या सदर रुग्णाचा ‘झिका’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे यावरून सिद्ध झाल्याचे काही लोक म्हणतायेत. दरम्यान हा रुग्ण उपचारानंतर पूर्णतः बरा झाला असून आठ दिवसांपूर्वीच तो घरी पोहोचला असल्याची माहिती समजली आहे.

झिकाबाधित रुग्ण संगमनेरचा असून नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात तो दाखल झाला होता. टेस्टिंग केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता व त्यांसुर उपचार सुरु होते.उपचारांनंतर तो व्यक्ती ठीक झाला व घरी आहे. याबाबत अहमदनगरच्या आरोग्य विभागास सांगण्यात आल्याचं डॉ. रावते (सहाय्यक वैद्यकीय अधिकारी) यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office