अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पत्रात छोट्या पुला जवळ आज दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार कोपरगाव गोदावरी पात्रात छोटा पुला जवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथका सह घटना स्थळी दाखल होऊन गावकरी व तरुणांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रा बाहेर काढला.
सदर अज्ञात महिलेचे वय ६५ वर्ष असून सदर महिलेचे नाव -लता अशोकराव शिंदे असून ते येवला तालुक्यातील तिन देऊळ येथील असल्याचे तपासात समजते आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.बी.एस.कोरेकर हे करत आहे.