अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग ! बनावट लग्नाचे आमिष दाखवणारी टोळी पकडली, आठ जणांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar News : कोल्हार (भगवतीपूर) येथे चालू वर्षात नववधू असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून ३ लाख २० हजार रुपये लुबाडून फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपी पोलीस कोठडीत आहे.

याप्रकरणी शंकर दशरथ गायकवाड (रा. भगवतीपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पाच महिला आरोपींसह, पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतिष बाबासाहेब शिंदे (रा. कोपरगाव), संतोष फकिरा चंदनशिवे, रामलाल राठोड (रा. छत्रपती शिवाजी नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना लोणी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान वरील आठ आरोपींनी संगनमत करून भगवतीपूर येथील मयूर दशरथ गायकवाड यास लग्नासाठी मुलगी दाखवितो म्हटले.

याकरिता फिर्यादी दशरथ गायकवाड यांच्याकडून ३ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र नववधू म्हणून विवाहितेसोबत लग्न ठरविले आणि फसवणूक केली. सदर माहितीच्या आधारे लोणी पोलिसांनी पथक तयार करून वरील ८ आरोपींमधील ४ जणांना अटक केली आहे.

लोणीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे व आशिष चौधरी, पो.हे.कॉ दिनकर चव्हाण, पो.ना. अरविंद मेढे, गणेश अदंगळे, पो.कॉ. मच्छिद्र इंगळे, जयश्री सातपुते,

मनीषा गिरी यांच्या पथकाने कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यातील संतोष बाबासाहेब शिंदे (रा. कोपरगाव) हा सराईत आरोपी असून फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24