अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- कोपरगाव शहरातील शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी झाल्याने एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

यात आरोपी म्हणून कैलास द्वारकानाथ जाधव,सागर कैलास जाधव,विशाल कैलास जाधव,समीर कैलास जाधव व दुसर्‍या गटातील किरण संदीप दळवी,बंटी प्रकाश दळवी,मोनू संदीप दळवी,व निशांत राजेंद्र झावरे आदी आठ जणांचा समावेश आहे.

त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे. ऋषिकेश संदीप दळवी वय 21 याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील बाजारतळ येथील रहिवासी असून व्यापारी धर्म शाळेजवळील रसवंती चालवतो मंगळवार दि 1 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता दुकानात असताना कैलास जाधव,

सागर जाधव, समीर जाधव, विशाल जाधव यांनी काल भांडण का केले असे विचारत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पुन्हा आमच्याशी भांडण करशील तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणाले,

आमच्या भांडणाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी निशांत झावरे आला असता त्याने आमची भांडण सोडवली असे फिर्यादीत म्हटले असून वरील चारही आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

दुसर्‍या फिर्यादीत समीर जाधव म्हटले की, धारणगाव रोड गणेश कॉलनी येथील रहिवासी असून आपण कोपरगाव बस स्थानकाजवळ तारा पान नावाचे पान दुकान चालवतो.

मंगळवार दि.1 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आपण आपल्या वरील पानाच्या दुकानावर असताना त्या ठिकाणी आरोपी किरण संदीप दळवी, बंटी प्रकाश दळवी, मोनु संदीप दळवी, निशांत राजेंद्र झावरे आदी चार जणांनी येऊन मागील भांडणाचे कारण उकरून काढून मला शिवीगाळ करू लागले.

तेंव्हा मी त्यांना समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने त्यांनी त्यांचे हातातील लोखंडी गजाने आपल्या पानाच्या दुकानांचे काचेचे काउंटर तोडून नुकसान केले आहे. तसेच, आमच्याशी भांडण करता काय? असे म्हणून धमकी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office