अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: एकाच वेळी पाच गावठी कट्टे पकडले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कारवाई करून एकाचवेळी पाच गावठी कट्टे पकडले. श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान यामध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी काही कट्टे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीरामपूर शहरातील गावठी कट्टे बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या पथकाने काल श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून ही कारवाई केली असल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

Ahmednagarlive24 Office