अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात ६ डिसेंबरच्या सकाळी, एका बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याला पकडताना वनविभागाचे वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर हे जखमी झले होते.
आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरा मध्ये पाच डिसेंबर रोजी बिबट्याने थेट शहरात बसून धुमाकूळ घातला होता.
सुमारे दिड तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक नागरीकांचे सहाय्याने बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं.
मात्र बिबट्याला पकडत असताना राहुरी वनविभागाचे वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते.
या घटनेचा व्हिडिओ चांगला झाला होता बिबट्याने थेट किनकर त्यांच्या मांडीला चावा घेतला होता किनकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण किनकर हे राहुरी तालुक्यातील ताराबाद येथील रहिवासी होते त्यामुळे तहाराबाद येथे शोककळा पसरली आहे.