अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: वादळी वार्‍यामुळे चौघांचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

AhmednagarLive24 : तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी शिवारात वादळी वार्‍यामुळे घर पडून तीन जण जागीच ठार झाले. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

विठ्ठल भिमा दूधवडे (वय 75), हौसाबाई भिमा दूधवडे (वय 80), साहिल पिनू दूधवडे (वय 10) असे मृत झालेल्यांची नावे आहेत.

तर वनिता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

मालदाड येथेही लिंबाचे झाड अंगावर पडून एक महिला जागीच ठार झाली आहे. सुरेखा राजू मधे (वय 28, रा. डोंगरगाव, ता. अकोले) असे मयत महिलेचे नाव आहे.

या घटना आज (गुरूवार) दुपारी 3.30 ते 4 वाजेच्या दरम्यान घडल्या. या घटनांनी संगमनेर तालुका हदरला आहे.

घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी सहकर्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले.

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे घरांवरील पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडले, विजेचे पोल कोसळले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहे

Ahmednagarlive24 Office