अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मुलीचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- भरधाव वेगात चालेल्या ट्रॅक्टरचालकाने समोर सायकलवर चाललेल्या मुलीस जोराची धडक दिली.

या अपघातात सायकलस्वार काजल अशोक पाडळे हीचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक दिनेश मोतीलाल राठोड याच्याविरूध्द बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, भरधाव वेगात चाललेल्या (एमएच १९ सीवाय ५१०५) या ट्रॅक्टरने पुढे सायकलवर चाललेल्या मुलीस पाठीमागून जोराची धडक दिली.

यात काजल अशोक पाडळे या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अपघात घाल्यानंतर संबंधित ट्रॅक्टरचालक मदत न करताच पळून गेला.

हा अपघात श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावच्या शिवारात निंबवी ते पिंपळगाव पिसा रोडवर आठाच्या मळ्यात घडला. याप्रकरणी महेश धोंडिबा पाडळे यांच्या फिर्यादीवरून

बेलवंडी पोलिसांनी ट्रॅक्टरचालक दिनेश मोतीलाल राठोड (रा.सातगाव डोंगरी तांडा,ता.पाचोरा,जि.जळगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोहेकॉख़ेडकर हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24