आम्हाला शिवीगाळ का करतो, असे विचारल्याचा राग आल्याने दोघा पती- पत्नीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की अंजली प्रदीप अंभोरे (वय २८ वर्षे) या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील नेहरू मैदान येथे राहातात. त्यांच्या घराजवळच प्रमोद नामदेव चोथे हा राहावयास असुन त्यास दारुचे व्यसन आहे.
तो नेहमीच दारु पिउन येवुन त्याचे कडील स्विप्ट कारच्या टेपचे गाणे मोठमोठ्याने लावुन गोंधळ घालतो व शिवीगाळ करतो. दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री १.४५ वाजेच्या सुमारास अंजली अंभोरे व त्यांचे पती घरामध्ये असताना प्रमोद नामदेव चोथे याने गाडी घेवुन गल्लीत येऊन उभा केली आणि शिवीगाळ करु लागला.
त्यावेळी अंजली अंभोरे व त्यांचे पती प्रदीप हे घराबाहेर येवुन त्यास विचारले तु आम्हाला शिवीगाळ का करतो. असे विचारल्याचा राग येवुन त्याने लोखंडी रॉडने अंजली अंभोरे व त्यांचे पती प्रदीप यांना मारहान केली.
त्यावेळी अंजली अंभोरे यांचे दीर संतोष सुरेश अंभोरे व सासु आशा सुरेश अंभोरे असे आले असता, त्यांनाही शिवीगाळ करुन मारहान केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अंजली प्रदीप अंभोरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी प्रमोद नामदेव चोथे, रा. नेहरु मैदान, वांबोरी, ता. राहुरी याच्या विरोधात गून्हा रजि. नं. १३१४ / २०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.