अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील झोळे येथे गणेशवाडी परिसरात असणार्या म्हसोबा नाल्यात शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या मामा व दोन भाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 17 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात शेळ्या धुवत असताना एका मुलाचा पाय घसरला असता दुसरा त्यास हात देण्यासाठी गेला,
या दरम्यान दोघे पाण्यात बुडाल्याचे पाहुन त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या मामाने पाण्यात उडी मारली असता या दोघांनी त्यांना जिवाच्या आकांताने घट्ट पकडले,
त्यावेळी दुर्दैवाने यात तिघांना जलसमाधी घ्यावी लागली आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात तिघांची आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मयुर संतोष गाढवे (वय 12), सुरज संतोष गाढवे (वय 15) व संजय भाऊसाहेब खर्डे (वय 40, तिघे रा. झोळे) अशी मयत झालेल्या तिघांची नावे आहेत.