अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर हॉटेल चालक व एका तरुणाने बळजबरीने धमकी देवून मारहाण करुन बलात्कार केला. विशेष म्हणजे एका महिलेने या प्रकरणात चिथावणी देवून साथ दिली.
ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५ ऑक्टोबर २०२० ते २० ऑक्टोबर 2020 यादरम्यान आरोपी दिलीप संतोष साठे, रा. ब्राम्हणी याच्या घरच्या बाजूला असलेल्या हॉटेल माऊलीच्या जवळ झाडाझुडपात १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ‘हा अत्याचाराचा प्रकार घडला.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.दीपाली काळे, डिवायएसपी राहुल मदने, पोनि देशमुख यांनी भेट दिली. या खळबळजनक प्रकरणी प्रतिष्ठित १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने राहूरी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी दिलीप संतोष साठे, मिराबाई संतोष साठे,
माऊली हॉटेलचा मालक (नाव माहीत नाही, सर्व रा. ब्राम्हणी) ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीत मुलीने म्हटले आहे की, ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपी नं. १ दिलीप संतोष साठे याने वेळोवेळी मारहाण करुन
बळजबरीने धमकी देवून बलात्कार केला तसेच आरोपी नं. २ मिराबाई संतोष साठे हिने आरोपी दिलीप साठे याच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध करण्यास ‘भाग पाडून त्या कामात चिथावणी दिली.
आरोपी १ दिलीप साठे याने पिडीत अल्पवयीन तरुणीस आरोपी क्र. ३ माऊली हॉटेलचा मालक याच्या ताब्यात देवून त्याच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. आरोपी क्र ३ हॉटेल चालक यानेही अल्पवयीन मुलीवर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध करुन बलात्कार केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved