अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा विनयभंग, पुरूषाचे अपहरण; पाच जणांवर आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- महिलांचा विनयभंग करत घरातील पुरूषाचे अपहरण केले. ही घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द अपहरण, मारहाण, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

विनयभंग झालेल्या पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद एकनाथ गोरे, विनोद एकनाथ गोरे, प्रमोदचा मेव्हणा सचिन अनभुले व त्यांच्या सोबत दोन अनोळखी विरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रमोद, विनोद, सचिन व दोन अनोळखी फिर्यादीच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या जावासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

फिर्यादीची सासुला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केले. तलवारीने तुकडे करून टाकु, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पतीला संमतीशिवाय बळजबरीने अज्ञात कारणासाठी अज्ञात ठिकाणी घेऊन गेले असल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.