अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे शेतीच्या बांधाच्या वादातून दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे या चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा खून झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता घडली.
पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ठोंबरे व महेश भिंगारदे यांची घरे व जमिनी शेजारी आहेत. दोन दिवसांपूर्वी भिंगारदे यांच्या उसाला तोड आली. अनेक दिवसांपासून त्यांच्यात बांध व वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद सुरू होता. मंगळवारीही त्यांच्यात वादावादी झाली.
ठोंबरे मुरूम पसरवत असताना भूपेंद्र महेंद्र भिंगारदे, अक्षय महेंद्र भिंगारदे, महेंद्र गुलाबराव भिंगारदे, कोमल धर्मराज भिंगारदे, राजेंद्र वसंतराव भिंगारदे यांनी ठोंबरे यांना खाली पाडले. भूपेंद्रने कुऱ्हाडीने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सर्व आरोपी घटनेनंतर फरार झाले.p
मृताचा भाऊ ज्ञानेश्वर लक्ष्मण ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व नेवासे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विजय ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली.