अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील परीटवाडी शिवारात एका वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी सातच्या पूर्वी परीटवाडी शिवारात एका ज्वारीच्या पिकात कमलाबाई चांगदेव वाघ (वय ७५, रा. परीटवाडी) यांचा मृतदेह डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत मिळून आला.

याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात रामदास चांगदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,

उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, दिनकर मुंडे यांनी भेट देऊन तपास सुरू केला.