अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : जिल्ह्यात आज तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. बोल्हेगाव फाटा (नगर), शेवगाव आणि राहाता येथील हे रुग्ण आहेत.
*कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून भावी निमगाव ( शेवगाव) येथे आलेला 41 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. ही व्यक्ती चालक म्हणून काम करत होती. 14 जून रोजी ही व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. ताप आणि श्वसनाच्या त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल झाला होता.
*कुर्ला नेहरूनगर येथून बोल्हेगाव फाटा, अहमदनगर येथे आलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. ही व्यक्ती कुर्ला नेहरूनगर येथे चालक म्हणून काम करत होती.आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाला होता.
*खाजगी प्रयोगशाळेत राहाता शहरातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६१, एकूण स्त्राव तपासणी ३५०८
कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २१३
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews