अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : पिकअपने तिघांना चिरडले ! मृतांचे अवयव च्छिन्न विच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- नगरहून टाकळीढोकेश्‍वरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिक अप व्हॅनने दुचाकीस धडक देउऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे प्रवासी जागीच ठार झाले आहेत.

गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भिषण आहे की अपघातानंतर दुचाकीवरील तिघाही व्यक्तींचे अवयव च्छिन्न विच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडले आहेत.

पारनेर पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर पारनेर तालुक्यातील ढोकी शिवारात हा अपघात झाला.

महामार्गावरील टोल नाका परिसरात नगरहून टाकळी ढोकेश्वरकडे जाताना पिक अप व्हॅनने टोल नाका ओलांडल्यानंतर हा अपघात झाला.

टोल नाका ओलांडून पिक अप व्हॅन टाकळीढोकेश्‍वरकडे भरधाव वेगाने जाताना पुढे चाललेल्या होंडा शाईन या दुचाकीस पिकअप व्हॅनने जोराची धडक दिली.

धडकेनंतर दुचाकीसह त्यावरील तिघेही दुचाकीसह काही अंतर फरफटत गेले. त्यात तिघाही व्यक्तींच्या शरीराचे अवयव छिन्न विच्छिन्न अवशेष महामार्गावर पडले होते.

मिळालेल्या माहीतीनुसार अपघातग्रस्त पिकअप व्हॅन दुचाकीस ठोकर देउन पसार झाली असून दुचाकीचा क्रमांक एम एच १७ बी सी ०१९५ असा आहे.

Ahmednagarlive24 Office