अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणात बहिणीचा खुलासा म्हणाली, गडाखांचा …..

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणात नामदार शंकरराव गाडाख यांच्यानंतर स्वता प्रतिक काळे या तरुणाच्या बहिणीनेही खुलासा केला आहे.

प्रतिक च्या आत्महत्या प्रकरणात गडाख कुटुंबाचा कोणताही संबंध नसल्याचे बहिणीने स्पष्ट केले. प्रतिकने व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप दारूच्या नशेत केली असल्याचे बहिणीने सांगितले असून

प्रतीकने मला आत्महत्येपूर्वी फोनवर सगळं सांगितले होते. या सर्व प्रकरणात गडाख दोषी असते तर आम्ही सोडलं नसतं, असं प्रतिकच्या बहिणीने म्हटलं आहे.

राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतिक काळे याने आत्महत्या केली.

ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली. रात्रीच्या वेळेस नगर-औरंगाबाद रोडवर प्रतिक याने आत्महत्या केली असून या घटनेने खळबळ उडालीय. या प्रकरणी संस्थेतील 7 जनाविरोधात नगरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केली. प्रतीक काळे याने काही वर्ष प्रशांत गडाख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिल्याची प्राथमिक माहिती आहे.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील क्रमचारी प्रतिक काळे या तरुणानं आत्महत्या केलीय. 30 ऑक्टोबर रोजी प्रतिक काळेनं आत्महत्या केलीय.

महत्वाची बाब म्हणजे प्रतिक काळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात त्याने 10 जणांची नावं घेतली आहेत.

त्या नावांमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचं आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचंही ही नाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.

Ahmednagarlive24 Office